Actress Hina Khan Health Update :

    सिनेजगतामधील ग्लॅमरसची अनेकांना भूरळ पडते. कलाकार प्रसिद्ध झाला की अनेकांना चित्रपट, मालिकेत काम करणे सोपं वाटते. मात्र, अनेक प्रेक्षकांना कलाकार घेत असलेली मेहनत लक्षात येत नाही. छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण अनेक तास सुरू असते. कलाकाराच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने आपण सलग 16 तास शूटिंग करत असून एक वेळचे जेवताही येत नसल्याचे म्हटले आहे. 


छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडली आहे. सध्या ती आपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मात्र, सततच्या शूटिंगमुळे तिला आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 




हिना खानची प्रकृती बिघडली... 


हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे हेल्थ अपडेट सांगितले. सतत 16 तास काम केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. हिनाने सांगितले की, तिला तिच्या कामात जेवायलाही वेळ मिळाला नाही.हिना खानने या स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा मेकअप केला जात असून त्याच वेळी ती जेवण करताना दिसत आहे. जेव्हा तुम्हाला कामाच्या दरम्यान जेवावे लागते. एक वेळचे जेवणही तुम्ही आरामात जेऊ शकत नाही. 






सलग 16 तासांच्या शूटिंगने अभिनेत्रीची प्रकृती बिघडली


हिना खानने आपल्या पुढील स्टोरीमध्ये मास्कसह झोपल्याचा फोटो शेअर केला आहे. सध्या मला अशाच प्रकारे झोपावं लागत असल्याचे हिना खानने सांगितले. पुढील फोटो हिनाने आपली ही अवस्था सतत 16 तास शूटिंग केल्याने झाली असल्याचे म्हटले आहे. 


 










दरम्यान, हिना खान ही नुकतीच मुनव्वर फारुकीच्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. टीव्ही मालिकेशिवाय हिना खानने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही आपली छाप सोडली आहे.