Hina Khan Reaction Rozlyn Khan : अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिना खान कॅन्सरचे उपचार घेत असून ती तब्येतीबाबतचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेक लोकांना तिच्या या खडतर प्रवासातून प्रेरणा मिळत आहे. असं असताना हिना खान कॅन्सरचा प्रसिद्धीसाठी वापर करत असल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्री रोजलीन खानने कर्करोगाच्या उपचारांच्या मुद्द्यावर हिना खानवर निशाणा साधला आहे.
हिना खानकडून प्रसिद्धीसाठी कॅन्सरचा वापर?
हिना खान हिने छोट्या पडद्यापासून सुरुवात करुन बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास केला आहे. सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं, तेव्हापासून हिना खान किमोथेरपीसह तिच्या सर्व उपचारांबाबतची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहे. मात्र, अभिनेत्री रोजलीन खानने या मुद्द्याला लक्ष्य करत तिच्यावर कर्करोगाचा वापर प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप केला आहे. केमोथेरपीमुळे तिचे टक्कल पडणे लपवल्याबद्दल तिने हिनावर टीका केली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप
अभिनेत्री रोजलीन खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना लिहिलंय की, 'केमोथेरपीमुळे टक्कल पडणे हे महिलेसाठी सर्वात मोठं दुःख असते. तुम्ही ते सामान्यपणे दाखवू शकता का? प्राणीसंग्रहालयातील सिंहीण धाडस दाखवेल का? ती तिसऱ्या टप्प्यातील उपचार पद्धतींबद्दल काही सांगू शकेल का, की तुम्ही फक्त बातम्यांमध्ये राहण्यासाठी कर्करोगाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे का?' दरम्यान, अभिनेत्री रोझलीन खानही ब्रेस्ट कॅन्सर सर्वाइव्हर आहे.
मनीषा कोइराला आणि सोनाली बेंद्रे यांच्याशी तुलना
रोजलिन पुढे लिहिलं आहे की, 'चुकीची माहिती पसरवण्याचं दयनीय आणि लज्जास्पद कृत्य. तुम्ही आणि काही इतर लोक, जे कर्करोगाचा वापर करून हेडलाईन्स बनवत आहेत, त्यांना चांगलेच माहिती आहे की, भारतात वैद्यकीय चुकीच्या माहितीसाठी कोणताही कायदा नाही. कोणतीही शिक्षा नाही. इथे चांगल्या आणि सर्वोत्तम दर्जाच्या अभिनेत्री आहेत, मग त्या सोनाली बेंद्रे असोत, लिसा असोत किंवा मनीषा कोइराला असोत, त्या कधीही लोकांना दिशाभूल करण्याच्या या पातळीपर्यंत उतरलेल्या नाहीत'.
"प्रसिद्धी मिळवण्यासाठी हिना खानचा दिखावा"
रोजलिन आणखी एक स्टोरी पोस्ट करत लिहिलं की, 'जीवघेण्या आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांप्रती तुमची काही सामाजिक जबाबदारी आहे का, की तुम्हाला फक्त तुमची व्यावसायिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कर्करोगाचा वापर करण्याची चिंता आहे?' तिच्या कर्करोगाच्या टप्प्याबद्दल योग्य माहिती देत आहे, याची मला खात्री नाही. तिने कधी एमआरएम आणि रेडिएशनच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्ण असल्याबद्दल बोललं आहे का? मी अशा मानसिक आजारी लोकांसाठी फक्त प्रार्थना करू शकते, जे कर्करोगाने ग्रस्त आहेत आणि त्याचा वापर प्रसिद्धी स्टंट म्हणून करतात. चला, कर्करोग झाला आहे आणि ही बातमी आहे, चला ती बातमी बनवूया.'
'हेडलाईन्समध्ये राहून सहानुभूती मिळवण्यासाठी PR स्टंट'
रोजलिन खानने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 'सहानुभूती मिळवण्यासाठी हा एक पीआर स्टंट आहे. सहानुभूती मिळवून बातम्यांमध्ये राहण्यासाठी हा फक्त एक पीआर स्टंट आहे.' बॉलिवूड बबलशी बोलताना रोजलिनने ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :