Saif Ali Khan Attack : बॉलिवूडचा 'नवाब' अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरुन चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. आरोपी मोहम्मदने धारदार शस्त्राने सैफच्या हातावर, मानेवर आणि पाठीवर वार केले आणि तिथून पळ काढला. या प्राणघातक हल्ल्यानंतर करिनाने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. करिनाने 100 नंबरला फोन न करता आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर करिना जखमी सैफला रुग्णालयात नेण्यासाठी तिने इतरांना संपर्क केला.


हल्ल्यानंतर करिनाचा IPS अधिकाऱ्याला फोन


घटनेनंतर सैफच्या घरी उपस्थित सगळे भयभीत झाले होते. करिनाने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर करिनाने 100 नंबरवर कॉल केला नाही. सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर करिनाने आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला, जर तिने 100 नंबरवर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता, तर आरोपी तेव्हाच पकडला गेला असता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.


 करिनानं 100 नंबरला फोन केला असता तर, 'त्या' रात्रीच...


सैफ अली खानच्या घरावर डल्ला मारण्याच्या हेतूने घरात शिरलेला मोहम्मद शरीफुल शहजाद तीन दिवस गुंगारा दिल्यानंतर पोलिसांच्या हाती लागला. 16 जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला झाला होता, त्यानंतर शनिवारी पोलिसांनी आरोपीला पकडलं. सध्या आरोपी मोहम्मद पोलिस कोठडीमध्ये आहे. जर करिनाने हल्ला झाला त्यावेळी नियंत्रण कक्षाला फोन केला असता, तर तातडीने पोलिस यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. 


पोलिसांचं काय म्हणणं आहे?


बुधवारी हल्ला झाला, त्या मध्यरात्री करिना कपूर खानने आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला, त्यावेळी प्रतिसाद न मिळाल्याने नंतर त्यांनी तातडीने रक्तबंबाळ सैफला रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात गेल्यावर पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. मात्र, हल्ला झाला त्यावेळीच 100 नंबरवर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली असती, तरी नाकाबंदी करुन त्या रात्रीचा आरोपीला पकडण्यात यश आलं असतं, असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


बांग्ला टू इंडिया व्हाया कोलकाता; सीमेवरची नदी ओलांडली अन् भारतात आला; कामाच्या शोधात मुंबईत पोहोचला, मोठा हात मारून बांगलादेशला पळण्याचा कट