Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर वांद्र्याच्या (Bandra) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरू आहेत. सैफच्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची कसून पोलीस चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.  अशातच आता सैफ आणि करिनाच्या वांद्र्यातील सद्गुरू शरणच्या (Satguru Sharan) अकराव्या मजल्यावरील ज्या घरात घटना घडली, त्या घरात धावपळ सुरू झाली आहे. 


वांद्र्यातील हायफ्रोफाईल एरियात असणाऱ्या सद्गुरू शरण इमारतीत सैफ आणि करिना अकराव्या मजल्यावर राहतात. त्याच घरात घुसून चोरट्यानं सैफवर जीवघेणा हल्ला केला. सैफवरच्या हल्ल्यानंतर आता सैफ आणि करिना ते घर सोडण्याचा विचार तर करत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. सैफिना राहात असलेल्या सदगुरु शरण इमारतीमधून सोमवारी दुपारी तैमूर आणि जेहची खेळणी काही कामगार दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सैफवरच्या गंभीर हल्ल्यानंतर ते घर सोडण्याचा विचार तर खान कुटुंबीय करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


राहतं घर सोडणार सैफ-करिना? 


सैफवर हल्ला झाला त्यावेळी पोलीस चौकशीतून त्याच्या घरात फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे तैमूर आणि जेहच्या घरातल्या सामानाची शिफ्टिंग फ्लोअर पॉलिशिंगसाठी आहे का? की, घरचं घराचं शिफ्टिंग सुरू आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. एका मराठी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, खेळणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारपूस केली, तर त्यांनी याबाबत काहीही बोलणं टाळलं. त्यामुळे ज्या इमारतीत सुरक्षा राम भरोसे आहे, त्या इमारतीतून काढता पाय घेण्याचा निर्णय सैफ आणि करिनानं घेतल्याच्या चर्चा होत आहेत, अशी माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :