एक्स्प्लोर
गायक-संगीतकार हिमेश रेशमिया दुसऱ्यांदा विवाहबंधनात
अभिनेत्री सोनम कपूर उद्योगपती आनंद अहुजासोबत, तर नेहा धुपिया अंगद बेदीसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता गायक-संगीतकार हिमेश रेशमियानेही गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केलं.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. अभिनेत्री सोनम कपूर उद्योगपती आनंद अहुजासोबत, तर नेहा धुपिया अंगद बेदीसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता गायक-संगीतकार हिमेश रेशमियानेही गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केलं.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली. हिमेश रेशमियाच्या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मुलगाही या लग्नासाठी उपस्थित होता.
सोनिया कपूर आणि हिमेश रेशमिया गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते, असं बोललं जातं. त्याने पहिल्या पत्नीसोबत याच अफेअरमुळे घटस्फोट घेतल्याची चर्चा होती. अखेर तो गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकला.
47 वर्षीय हिमेशने अगदी साध्या पद्धतीने घरीच हा विवाह केला. कुटुंबातील काही सदस्य आणि मित्रांचीच या लग्नाला उपस्थिती होती. हिमेश लग्नानंतर लगेचच दुबईला हनीमूनसाठी जाणार आहे.
हिमेश रेशमियाचं हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न कोमलसोबत 1995 साली झालं होतं. मात्र 2017 मध्ये दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.
संबंधित बातम्या :
गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचा घटस्फोट
हिमेश रेशमियाचा 22 वर्षांचा संसार मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
