एक्स्प्लोर

#MeToo : हिमानी शिवपुरींचाही आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप

"आलोकनाथ हे दारु प्यायल्यानंतर पूर्णपणे बदलून जातात आणि हेच त्यांच्या समस्येचं मूळ आहे"

मुंबई : निर्मात्या विनता नंदा आणि अभिनेत्री संध्या मृदुल यांच्या आरोपानंतर आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही  ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आलोकनाथ यांनी एनएसडीमध्ये शिकत असताना रुममध्ये घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिमानी शिवपुरी यांनी केला आहे. नेमकं काय घडलं होतं एनएसडीमध्ये? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) शिकत असताना अभिनेते आलोकनाथ हे हिमानी शिवपुरी यांचे सिनियर होते. त्यावेळी एकदा आलोकनाथ मद्यधुंद अवस्थेत हॉस्टेलमध्ये आले आणि आपल्या रुममध्ये घुसल्याचा आरोप हिमानी शिवपुरींनी केलाय. “आलोकनाथ यांनी काही अतिप्रसंग करण्याआधीच मी आरडा-ओरड केली. त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहणारे इतर लोक गोळा झाले आणि आलोकनाथ यांना तिथून पळवून लावले.”, असा गंभीर आरोप हिमानी शिवपुरींनी केला. अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यासोबत ‘हम आपके हैं कौन’, ‘परदेस’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले असून, काही मालिकांमध्येही आलोकनाथ आणि शिवपुरींनी सोबत काम केलंय. आलोकनाथ हे दारु प्यायल्यानंतर पूर्णपणे बदलून जातात आणि हेच त्यांच्या समस्येचं मूळ आहे, असं हिमानी शिवपुरींनी सांगितलं. काही वर्षांपूर्वी इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना, ते सातत्याने दारु पित होते. त्यावेळीही ते हिंसक झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी आशुही सोबत होती, अशी माहिती हिमानी शिवपुरींनी दिली. यावेळी हिमानी शिवपुरींनी आलोकनाथ यांच्या आणखी एका कारनाम्याची कथा सांगितली. दुबई विमानतळावर उघड्यावर लघवी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडले होते. फिल्म इंडस्ट्रीत अनेक मुली लैंगिक शोषणाला बळी पडतात. मात्र कुणी जाहीर बोलण्यास धजावत नाही. कारण काम मिळणार नाही, याची त्यांना भीती वाटते, असेही शिवपुरी म्हणाल्या. विनता नंदा आणि संध्या मृदुल यांचेही आलोकनाथ यांच्यावर आरोप प्रसिद्ध अभिनेत्री संध्या मृदुल यांनीही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत आलोकनाथ यांनी आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा संध्या मृदुल यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्याआधी 'तारा' मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनीही आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget