Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिची फॅशन स्टाइल खूप फॉलो केली जाते आणि त्यामुळे ती कायम चर्चेत असते. सोनम सोशल मीडियावरसुद्धा खूप सक्रिय असते. ती दररोज काहीतरी शेअर करत असते. चाहतेही सोनमच्या नव्या पोस्टची वाट पाहात असतात. अलिकडेच सोनमने आपला नव्या लूकमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोतील सोनमचा लूक पाहून चाहत्यांना हसू आवरेना असे झाले आहे.
सोनम नेहमीच लुकवर खूप प्रयोग करत असते. नव-नव्या प्रयोगामुळे सोनमच्या चाहत्यांना तिची स्टाईल खूप आवडते. पण अनेक वेळा तिचा ड्रेस असा बनतो की चाहते हसतात आणि तिच्या पोस्टवर मजेशीर कमेंट करत असतात. सोनम कपूरने अलिकडेच शेअर केलेल्या फोटोलाही चाहत्यांनी नेहमीप्रमाणे मजेशीर कमेंट केल्या आहेत.
सोनमने नुकतेच फोटोशूट केले होते. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कफ्तान परिधान केला आहे. या कफ्तानच्या प्रिंटिंग आणि स्टाईलच्या पद्धतीमुळे सोनमच्या पोस्टवर यूजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल देखील झाली आहे.
सोनमने या आउटफिटसोबत लाल लिपस्टिक लावली होती आणि साधा बन बनवला होता. तिची पोज थोडी विचित्र होती. फोटोशुटवेळी ती दुसरीकडेच पाहताना दिसत आहे.
सोनमच्या फोटोवर एका यूजरने म्हटले की, तुम्ही माझ्या कारचे कव्हर का घातले? तर दुसऱ्या युजरने म्हटले, मॅडम प्लीज हा ड्रेस परिधान करून पाहा, आपल्या परिसरात तंबू उभा करावे लागतील. एका यूजरने कमेंट केली आहे की, रणवीर विचार करत असेल, आपण नोकरी सोडली पाहिजे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी सोनमच्या फॅशन सेन्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Moonfall : रोलँड एमेरिचचा 'मूनफॉल' 11 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
- Urmila Matondkar : शाहरूख थुंकला नाहीच, ट्रोल करणाऱ्यांना भान नाही; उर्मिला मातोंडकरांचा संताप
- Upcoming Movies : गंगूबाई काठियावाडी, गेहराईंया अन् बधाई दो; 'या' धमाकेदार चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी
- Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई