मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांना अखेरचा निरोप देताना बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने (shahrukh khan) केलेल्या एका कृतीवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शाहरुख खानचा फोटो व व्हिडिओ चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. यावरच आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं.





लता दिदींच्या पार्थिवावर शाहरूख थुंकला नाही, तर त्यानं दुआ फुंकली. असे वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भाषेत उत्तर दिलंय. समाज म्हणून आपण कुठे चाललोय?  टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं. अशा कडक शब्दात उर्मिला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या निधनाने अवघा देश हळहळला. लतादिदी सदैव स्मरणात राहतील असे उर्मिला यांनी सांगितले


शाहरूख खान थुंकला?


लता मंगेशकर यांचं पार्थिव अंत्यसंस्कारांपूर्वी ते काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यादरम्यान दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते. त्यावेळी शाहरुख खानने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता. दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते. शाहरुख आणि पूजा वरती चढल्यानंतर शाहरुखने पुष्पचक्र वाहिलं. शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा मास्क त्याच्या चेहऱ्यावर होता. दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली. यानंतर शाहरुख आणि पूजा दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा पूर्ण करून शाहरुखने आधी हात जोडून आणि मग वाकून पार्थिवाला नमस्कार केला आणि मग ते खाली उतरले.


 


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट