Hi Nanna Twitter Review: साऊथ चित्रपटासृष्टीमधील स्टार नानी (Nani) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा 'हाय नन्ना' (Hi Nanna) हा चित्रपट आज  (7 डिसेंबर) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे. 'हाय नन्ना' या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटामधील नानी आणि मृणालच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.


नेटकऱ्यांनी केलं कौतुक (Hi Nanna Twitter Review)


एका नेटकऱ्यानं हाय नन्ना या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. त्यानं ट्विटरवर शेअर केलेल्या रिव्ह्यूमध्ये लिहिलं, "हा कौटुंबिक प्रेमकथा असलेला अतिशय सुरेख चित्रपट आहे. वीकेंडला तुमचे कुटुंब  हा चित्रपट पाहू शकते. ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. चित्रपटाचा  पहिल्या हाफ चांगला आहे, तसेच चित्रपटाचा दुसरा हाफ आणि क्लायमॅक्स देखील छान, नानीनं  नेहमीप्रमाणे चांगले काम केलं आहे. मृणालनं देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे."






 "हा मास्टरपीस मनाच्या खोलवर रुजतो. चित्रपटातील संगीत उत्तम आहे, आणि चित्रित केलेल्या भावना खोलवर हलवल्या आहेत, मला हा चित्रपट वीकेंडला पुन्हा बघायला आवडेल.", असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.










चित्रपटाची कथा 


'हाय नन्ना' या चित्रपटात वडील आणि त्याच्या सहा वर्षांच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. जेव्हा अभिनेता लग्न करते तेव्हा त्यांचे आयुष्य बदलते. या चित्रपटात नानी, मृणाल ठाकूर आणि श्रुती हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  शौर्यव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


संबंधित बातम्या:


Fighter Teaser Release Date Aanounced: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'चा टीझर