Prasad Khandekar: आज हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. अशातच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा देखील विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानसभेत सांगितलं की, "एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीयेत." दरेकरांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु'.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
हिवाळी अधिवेशनामध्ये एकदा काय झालं या चित्रपटाबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले,"8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट रिलीज होत आहे. पण काही बॉस लोकं आहेत, जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळवू देत नाहीत."
प्रवीण दरेकर यांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणीस म्हणाले, "प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यांच्या सिनेमाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल, तर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल."
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची स्टार कास्ट
प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने,विशाखा सुभेदार, वनिता खरात यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसाद खांडेकरनं एकदा येऊन तर बघा या 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत.हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर!" प्रसाद खांडेकर हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. प्रसाद हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. अशातच आता त्याच्या 'एकदा येऊन तर बघा'या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे.
संबंधित बातम्या: