मुंबई: बंगरुळमध्ये सुरु असलेल्या सराव शिबीरात जाऊन विराट कोहलीला भेटल्याच्या वृत्ताचं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं खंडन केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का आपला आगामी सिनेमा 'सुल्तान'च्या शुटींगमधून वेळ काढून बंगळुरुत विराटला भेटण्यासाठी गेली होती. पण आपण विराटला भेटायला गेलो नसल्याचं स्पष्टीकरण अनुष्कानं दिलं आहे.
अनुष्काकडून स्पष्ट करण्यात आलं की, 'बंगळुरुत कोहली आणि अनुष्काची भेट हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे.'
अनुष्का म्हणाली की, 'मी आजारी होती. तरी देखील सिनेमाचं प्रमोशन करीत होते. त्यामुळे मी त्यासाठी मुंबईत होते. त्यामुळे बंगळुरुत असल्याचं वृत्त फारच निराशाजनक आहे.'
सध्या अनुष्का 'सुल्तान' सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. त्यानंतर फिल्लौरी आणि करण जोहरच्या ए दिल है मुश्किल सिनेमात दिसणार आहे.