Hema Malini On Baghban: अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वीर-जारा, बागबान (Baghban) या चित्रपटांमधील हेमा मालिनी आणि  बिग बींच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा बागबान हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. पण या चित्रपटातचार मुलांच्या आईची भूमिका करायला हेमा मालिनी या तयार नव्हत्या. पण एका व्यक्तीच्या सांगण्यावरून हेमा मालिनी यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी होकार दिला.


एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी सांगितलं, मला आठवतं की रवी चोप्रा मला बागबान चित्रपटाची कथा सांगत असताना माझी आई माझ्यासोबत बसली होती. ते गेल्यावर मी म्हणाले - ते अशा चार मुलांच्या आईची भूमिका करायला सांगत आहेत. मी हे कसे करू शकते? पण माझी आई मला म्हणाली,  तू या चित्रपटात काम कर. मी तिला म्हणाले, 'का?' त्यावर माझी आई म्हणाली,'ही कथा खूप चांगली आहे. तू हे केलेच पाहिजे.' तेव्हा मी तिला म्हणाले, ठीक आहे, 'पण मी मोठ्या गॅपनंतर काम करत आहे, मी हा चित्रपटात का काम करु?' यावर आई म्हणाली, ही भूमिका खूप चांगली आहे.


बागबान चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये लग्नानंतर मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबत राहू इच्छित नाहीत. अजूनही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. बागबाननंतर हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी वीर-जारामध्येही एकत्र काम केले होते. हा चित्रपट देखील हिट ठरला.






हेमा मालिनी यांचे चित्रपट


 मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेमुळे हेमा मालिनी यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hema Malini : "त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली"; हेमा मालिनींचा गौप्यस्फोट