Hema Malini : हातात चाकू घेऊन पाकिस्तानी फॅन शिरला हेमा मालिनी यांच्या घरात, धक्क्याने वडिलांनी गमावला जीव
बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या केवळ इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक नाही तर एक यशस्वी राजकारणी देखील आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे कोट्यवधी फॅन फॉलोइंग आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाहते यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण हेमा मालिनीच्या आयुष्यात एका चाहत्याने अशी काही गोष्ट केली की त्यामुळे हेमा मालिनीच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.
एक काळ असा होता जेव्हा हेमा मालिनी यांनी आपल्या चुलबुली शैली, शानदार अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होताच, पण लाखो चाहते त्यांच्या सौंदर्याने थक्क झाले होते.
हेमा मालिनी यांचा विवाह धर्मेंद्र यांच्याशी झाला होता आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत होत्या. पण 1968 मध्ये त्याच्या स्टारडमुळे त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.
या काळात हेमा मालिनी यांचे करिअर शिखरावर होते. भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते होते. असाच एक पाकिस्तानी चाहता सीमा ओलांडून हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी भारतात पोहोचला होता.
हा चाहता हेमा मालिनी यांच्या मुंबईतील घराबाहेर तासनतास बसून त्यांची एक झलक पाहण्याची वाट पाहत असे.
अनेक दिवस गेले, मग महिने उलटले पण ही व्यक्ती हेमा मालिनी यांना भेटू शकली नाही. एके दिवशी ही व्यक्ती गुपचूप हेमा मालिनी यांच्या घरात घुसली.
ही पाकिस्तानी व्यक्ती हेमा मालिनी यांच्या घरात शिरताच नोकरांनी त्यांना चोर समजून पकडलं. दरम्यान, त्या व्यक्तीने घाबरून टेबलावर पडलेला चाकू उचलला आणि त्यामुळे घरात असलेले लोक चांगलेच घाबरले.
दरम्यान, हेमा मालिनी यांचे वडीलही तेथे आले आणि घरात चाकू घेऊन उभी असलेली व्यक्ती पाहून ते घाबरले. त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण अचानक बसलेला धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
घरातील लोकांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र या घटनेनंतर हेमा मालिनी यांचे न भरून येणारं नुकसान झालं. त्यानंतर कित्येक महिने हेमा मालिनी यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.