Gadkari : नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आयुष्यावर आधारित 'गडकरी' (Gadkari) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'गडकरी' या सिनेमात नितीन गडकरी यांची भूमिका अमराठी अभिनेता साकारणार आहे. अभिनेता राहुल चोपडा (Rahul Chopda) नितीन गडकरींच्या भूमिकेत दिसणार आहे. 


नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा


नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. नितीन गडकरी यांच्या भूमिकेत राहुल चोपडा चपखल बसले आहेत. त्यांची देहबोली, संयमी स्वभाव, कठोर तरीही प्रसंगी हळवे मन या विविध छटा राहुल चोपडा यांनी उत्तम साकारल्या आहेत. 






राहुल चोपडा हे अमराठी असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. राहुल चोपडा हे अभिनेते असून अनेक सिनेमांत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. पण 'गडकरी' या सिनेमाने त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. 


राहुल चोपडांनी पोस्ट करत दिलेली माहिती


राहुल चोपडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना 'गडकरी' सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे; राजकारणी, समाजकारणी, प्रयोगशील शेतकरी व केंद्रीय मंत्री, भारताचे हायवेमॅन 'श्री. नितीन गडकरी' यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपट..'गडकरी' 27 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत".


'गडकरी'चा ट्रेलर आऊट!


हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली. 


ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील चढ उतार ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय आणि खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा असामान्य प्रवास २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहाता येणार आहे. 



संबंधित बातम्या


Gadkari Movie: नितीन गडकरी, सेन्सॉर बोर्ड अन् कामचुकार अधिकारी; 'गडकरी' सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?