एक्स्प्लोर

‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन वाद झाला आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियारने तिच्याविरोधातील गुन्हेगारी खटला रद्द करण्याची मागणी करत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब या प्रकरणात सहयाचिकाकर्ते आहेत. या सिनेमातील एका गाण्यावरुन वाद सुरु आहे. आपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीररित्या व्यावसाय करण्याचा घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. गाण्याचं चुकीचा अनुवाद केल्याचा आरोप करत तक्रारदार आमच्या मुलभूत अधिकारांचं हनन करत आहेत, असे प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. प्रकरण काय आहे? ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन वाद झाला आहे. हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. काय आहे व्हिडिओ? ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातील हे गाणं आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं असून व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत. कोण आहे प्रिया प्रकाश वारियर? प्रिया प्रकाश वारियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे. पाहा गाण्याचा व्हिडीओ : संबंधित बातम्या :

'या' क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन

इंटरनेट सेन्सेशन प्रियाविरोधात भावना दुखावल्याची तक्रार

आधी डोळे, आता गन शॉट, प्रिया वॉरियरचा नवा व्हिडीओ

'नॅशनल क्रश' प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या

प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!

डोळा मारणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget