एक्स्प्लोर

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच अंतिम निर्णय घ्यावा : हायकोर्ट

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच अंतिम निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच अंतिम निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. आचारसंहितेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक प्रदर्शित होत असल्याचा विरोध करत आरपीआय(आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने सोमवारी निकाली काढली. सध्या 'पीएम मोदी' चित्रपटाच्या केवळ ट्रेलरलाच परवानगी दिली असून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्रांवर येत्या 48 तासांमध्ये निर्णय घेणार असल्याचे सीबीएफसीने हायकोर्टात सांगितले. याचिकाकर्ते यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांचे वकील अॅड. गणेश गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोमवारच्या सुनावणीत एका मध्यस्त याचिकाकर्त्याला माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी साधराणत: 3 ते 4 आठवड्यांत होणारी प्रक्रिया सेन्सॉर बोर्डाने आठवड्याभरात पार पाडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी राजकीय वरदहस्त वापरल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितले. परंतु सेन्सॉर बोर्डाला नियमावलीच्या कलम 42 नुसार तसे अधिकार असल्याचे सीबीएफसीकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत 'पीएम मोदी' या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. देशातील आगामी लोकसभा निवडणुका या पारदर्शकरित्या पार पडण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत सतीश गायकवाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आमचा चित्रपटाला विरोध नाही, परंतु ज्या काळात तो प्रदर्शित होत आहे, त्याला विरोध आहे. त्यामुळे हा चित्रपट निवडणुकांच्या काळात प्रदर्शित न होता निकालांनंतर प्रदर्शित करावा. अशी मुख्य मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. येत्या 5 एप्रिलला चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित होणार असून अभिनेता विवेक ओबेरॉय हा नरेंद्र मोदींच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget