Vivek Oberoi Birthday : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याचा आज (3 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्याचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी हैदराबाद येथे झाला. आज तो आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. विवेक हा बॉलिवूड अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. विवेक ओबेरॉयने 2002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ ता चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांना 'फिल्मफेअर अवॉर्ड'ही मिळाला होता. विवेकची 20 वर्षांची फिल्मी कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली होती. व्यावसायिक आयुष्यापेक्षा विवेक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त गाजला.
विवेकचे (Vivek Oberoi) बॉलिवूड पदार्पण खूप यशस्वी ठरले होते. मात्र, त्याला चित्रपटापेक्षा अधिक ऐश्वर्या रायसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. पण, ऐश्वर्याशी जवळीक वाढल्यामुळे तो थेट सलमान खानच्या निशाण्यावर आला आणि हळूहळू याचा परिणाम त्याच्या करिअरवर देखील दिसू लागला.
ऐश्वर्यासोबत जोडले नाव
विवेक ओबेरॉयचे फिल्मी करिअर चांगले चालले होते. या काळात त्याने असे काही केले, ज्याचा त्याच्या करिअरवर थेट परिणाम झाला. ऐश्वर्या आणि सलमानची भेट 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 1999-2001 पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले होते. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. दरम्यान, विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढली. प्रेमभंग झालेली ऐश्वर्या आधीच दुःखी होती आणि अशा वेळी विवेक ऐश्वर्याचा आधार बनला. दोघांनी 'क्यों हो गया ना' चित्रपटात एकत्र काम केले. पण, ऐश्वर्याच्या नादात विवेकने सलमानशी पंगा घेतला आणि स्वतःचे करिअर उद्ध्वस्त केले.
‘ती’ चूक पडली महागात!
यादरम्यान विवेक ओबेरॉयने आणखी एक मोठी चूक केली. विवेकने एक पत्रकार परिषद बोलावली आणि त्याला सलमानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यात म्हटले. तर, सलमानने त्याला तब्बल 42 वेळा फोन केला, असा दावा देखील त्याने केला. यानंतर जणू विवेकचे आयुष्यच बदलून गेले. जिच्यासाठी विवेकने एवढं मोठं पाऊल उचललं, तिनेही त्याची साथ सोडून दिली. मात्र, या सगळ्याचा परिणाम विवेकच्या करिअरवर झाला.
मंत्र्याच्या मुलीसोबत बांधली लग्नगाठ!
ऐश्वर्यासोबतच विवेकच्या (Vivek Oberoi) हातून अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही गेल्या. हे प्रकरण सुरु होते तेव्हा सलमान खान इंडस्ट्रीतील एक मोठा स्टार होता, तर विवेकने नुकतेच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. सलमानच्या दबदब्यामुळे फिल्म इंडस्ट्रीतील कोणीही विवेकला आपल्या चित्रपटात कास्ट करू इच्छित नव्हते. या घटनेनंतर विवेकची कारकीर्द यशाची उंची गाठू शकली नाही. यानंतर तो काही काळ चित्रपटसृष्टीतूनही गायब झाला होता. यानंतर त्याने 2010 मध्ये अरेंज मॅरेज केले. त्याची पत्नी प्रियांका अल्वा कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांची कन्या आहे.
हेही वाचा :
Vivek Oberoi ला विना हेल्मेट गाडी चालवणे पडले महागात, वाहतूक पोलिसांनी आकारला 500 रूपयांचा दंड