Vivek Oberoi ला विना हेल्मेट गाडी चालवणे पडले महागात, वाहतूक पोलिसांनी आकारला 500 रूपयांचा दंड

अभिनेता विवेक ओबेरॉयवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

Continues below advertisement

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयला विना हेल्मेट, विना मास्क मोटरसायकल चालवणे चांगलेच महागात पडले आहे. कारण या प्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी विवेकवर 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विवेक विना हेल्मेट मोटरसायकल चालवतनाना व्हिडीओ समाज सेवक बिनु वर्गीस यांनी ट्वीट केला होता, त्यानंतर वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.

Continues below advertisement

अभिनेता विवेक ओबेरॉयने व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पत्नीसोबतचा मोटरसायकलवर एक व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो विना हेल्मेट आणि विना मास्क गाडी चालवत होता. या व्हिडियोत विवेक ओबोरॉय हा मोटारसायकल चालवत एका पेट्रोल पंपावर आला आणि त्याने त्याच्या अनेक चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. समाजसेवक बिनु वर्गीस यांनी ही बाब ट्विटरच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी विवेक ओबेरॉयवर भादंवि कलम 188, 269, मोटर वेहिकल अॅक्ट कलम 199,177 आणि Epidemic act कायदान्वये कारवाई केली आहे. वाहतुक पोलिसांनी विना हेल्मेट मोटरसायकल चालवल्याबद्दल 500 रुपयांचा ई-चलनद्वारे दंड आकारला आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola