Happy Birthday Vamika : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली  (Virat Kohli) यांची लेक वामिका (Vamika) हिचा आज वाढदिवस आहे.  गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी वामिकाचा जन्म झाला होता. आज वामिका एक वर्षाची झाली असून विरुष्काचे चाहते वामिकाला वाढदिवसाच्या  भरभरून शुभेच्छा देत आहेत.





कोहली कुटुंब सध्या दक्षिण आफ्रिकेत असून तिथेच वामिकाचा वाढदिवस साजरा करणार आहे. सध्या ट्विटरवर 'हॅपी बर्थडे वामिका' ट्रेंड करत आहे. वामिका एक वर्षाची झाल्याने विरुष्काचेदेखील चाहते कौतुक करत आहेत. चाहते विराट-अनुष्का आणि वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काहींनी तर विराट आणि अनुष्का डेट करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत.





विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलीच्या गोपनीयतेची खूप काळजी घेतात. त्यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केलेला नाही. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काने फोटो शेअर न केल्याबद्दल मीडिया आणि फोटोग्राफर्सचे आभार मानले होते. Chakda Express हा अनुष्काचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Rekha Kamat : आजच्या तरुणांची आजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन


Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव, अतुल कपूरला कोरोनाची लागण


Pankaj Tripathi Web Series : पंकज त्रिपाठीने सुरू केले 'क्रिमिनल जस्टिस'चे शूटिंग, तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha