एक्स्प्लोर

Happy Birthday Shaan : वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी गायनाला सुरुवात, लहान वयातच सांभाळली कुटुंबाची जबाबदारी! वाचा गायक शानबद्दल...

Happy Birthday Shaan : हिंदी चित्रपट आणि संगीतातील प्रसिद्ध गायक शान याचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला.

Happy Birthday Shaan : सुप्रसिद्ध गायक शान (Shaan) याचा आज (30 सप्टेंबर) वाढदिवस आहे. हिंदी चित्रपट आणि संगीतातील प्रसिद्ध गायक शान याचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी (Shantanu Mukherjee) आहे. शानने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. शानचा हा संगीत प्रवास वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सुरु झाला होता. शानला संगीताचा वारसा त्याच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता. शानचे आजोबा जहर मुखर्जी हे प्रसिद्ध गीतकार होते. तर, त्याचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते.

शानने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू आणि कन्नड भाषांमध्येही गाणी गायली आहेत. यासोबतच तो एक लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. त्याने टीव्हीवर 'सारेगामापा', 'सारेगामापा लिटिल चॅम्प्स', 'स्टार व्हॉईस ऑफ इंडिया' आणि 'म्युझिक का महामुकबाला' यासह इतर अनेक शो होस्ट केले आहेत. शानप्रमाणेच त्याची बहीण सागरिकाही एक प्रसिद्ध गायिका आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरुवात

घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण असल्याने शानचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने गायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शान जाहिरातींसाठी जिंगल्स गात होता. शान 13 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर, शानची आई संगीताच्या दुनियेत सक्रिय झाली, ज्यामुळे त्यांच्या घराचा आर्थिक डोलाराही सावरला. शानने लहानपणापासूनच जाहिरात चित्रपटांसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. वयाच्या 17व्या वर्षी त्याने पहिल्यांदा चित्रपटात गाणे गायले.

‘या’ गाण्यांनी मिळाली ओळख

शान आणि त्याची बहीण सागरिका यांनी पहिल्यांदाच एका म्युझिक कंपनीसाठी गाणी गायली होती. त्यात काही रिमिक्स गाण्यांचाही समावेश होता. शानचा अल्बम हिट ठरला. पण, शानने स्वतः लिहिलेल्या 'भूल जा' आणि 'तन्हा दिल' या गाण्यांमधून त्याला खरी ओळख मिळाली. त्याची दोन्ही गाणी 1999 मध्ये रिलीज झाली होती. यानंतर शानने कधीही मागे वळून पाहिले नाही.

हिट चित्रपटांसाठी गायली गाणी

शानने ‘अशोका’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘जब वी मेट’, ‘तारे जमीन पर’, ‘3 इडियट्स’, ‘ओम शांती ओम’, ‘हे बेबी’, ‘हमको दीवाना कर गये’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘तेरे नाम’ आणि ‘टोटल धमाल’ यासह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. या सर्व चित्रपटांमधून शानने आपल्या सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 30 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Embed widget