Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 49 वा वाढदिवस. रोहितचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील एम. बी. शेट्टी हे ज्यूनियर आर्टिस्ट होते. एम. बी. शेट्टी यांनी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहितनं वयाच्या 17 व्या वर्षी अजय देवगणच्या (Ajay Devgn) फुल और कांटे या चित्रपटाचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सुहाग या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बॉडी डबलचं काम रोहितनं केलं.  


खडतर आयुष्य 
एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीनं सांगितलं की, 'लोकांना वाटतं की मला खूप सोप्या पद्धतीनं बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळाली. पण मी जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा माझी पहिली कमाई ही 35 रूपये होती. अनेक वेळा मला हा प्रश्न पडत होता की मी जेवण करू की ट्रॅव्हल करण्यासाठी हे पैसे वापरू, कधी मी जेवण न करता प्रवास करात होते तर कधी जेवण करून चालत घरी जात होतो.' 


रोहित पुढे म्हणाला, 'त्यावेळी मी अर्थिक अडचणींचा सामना करत होतो. आमच्याकडे घर नव्हते त्यामुळे आम्ही दहिसरमध्ये माझ्या आजींच्या घरी राहात होतो. अनेक वेळा मी मलाड पासून अंधेरी पर्यंत चालत प्रवास केला आहे. '


रोहितचे हिट चित्रपट 
गोलमाल, संडे, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम आणि बोल बच्चन या रोहितनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, 
 
रोहित कोट्यवधींचा मालक  
एकेकाळी आर्थिक अडचणींना सामोरं जाणारा रोहित शेट्टी आता कोट्यवधींचा मालक आहे. रिपोर्टनुसार, रोहितची एकूण संपत्ती 300 कोटी आहे. नवी मुंबई येथे रोहितचं आलिशान घर आहे हे घर त्यानं 2012 साली खरेदी केलं. या घराची किंमत सहा कोटी आहे. त्याचप्रमाणे रोहितकडे बीएमडब्ल्यू, रेंज रोवर आणि मर्सिडीज या लग्झरी गाड्या देखील आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha