Kartik Aaryan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिक सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. कार्तिकला बेस्ट अॅक्टर पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आलं, मुंबईमध्ये आयकॉनिक गोल्ड पुरस्कार 2022 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्तिक आर्यननं या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर कार्तिकला रेड कार्पेटवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कार्तिकनं या प्रश्नांना हटके पद्धतीनं उत्तरं दिली आहेत. 


रेड कार्पेटवर एका व्यक्तीनं कार्तिकला प्रश्न विचारण्यात आला की, 'वाईट कमेंट वाचल्यानंतर तुला कसं वाटतं?' प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं की, 'मी वाईट कमेंट्स वाचत देखील नाही.' पुढे त्याला प्रश्न विचारण्यात की, 'बॉलिवूडमधील लोक तुला त्रास देत आहेत का?' या प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं, 'असं काही नाही मला कोणी त्रास देत नाही.'


रिपोर्टनुसार, धर्मा प्रोडक्शनच्या दोस्ताना 2 या चित्रपटामधून कार्तिकला काढण्यात आलं. त्यामुळे बॉलिवूडमधील लोक कार्तिकला त्रास देत आहेत का ? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत होता.  






धमाका या चित्रपटातील अभिनयासाठी कार्तिकला 'आयकॉनिक बेस्ट एक्टर ऑफ द ईयर' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्काराचा फोटो शेअर करून कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'अर्जुन पाठक बेस्ट आहे.' कार्तिकच्या भूल भूलैया 2, फ्रेडी, शहजादा या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha