Happy Birthday Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचं नाव अशा कलाकारांमध्ये घेतलं जातं, ज्यांनी मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली.आपल्या दमदार अभिनयाने अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन यांचा जन्म 20 जुलै 1950 साली एका नवाब कुटुंबात झाला. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्राचा भाग आहेत. 1967 साली आलेल्या "अमन" चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नसीरुद्दीन शाह एक उल्लेखनीय अभिनेते आहेत. ज्यांना आतापर्यंत 3 राष्ट्रीय पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कारांसह पद्मभूषण आणि पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नसीरुद्दीन यांना बॉलिवूडचा टिपिकल 'हिरो' अशी ओळख कधीच मिळाली नाही. मात्र, आजवर त्यांनी ज्या भूमिका स्वीकारल्या त्या त्यांनी अक्षरशः पडद्यावर जिवंत केल्या. शाह यांनी केवळ हिंदी सिनेमातच काम केले नाही तर त्यांनी इंग्रजी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी अशा विविध भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काही गाजले्ल्या चित्रपटांबद्दल.


जाने भी दो यारो (1983)


जाने भी दो यारो हा सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे जिथे नसीरुद्दीन शाहने आपल्या विनोदी भूमिकेने सर्वांची मने जिंकली. विनोद (नसीरुद्दीन शाह) आणि सुधीर (रवी बसवानी) या दोन पात्रांभोवती या चित्रपटाची कथा फिरते.या चित्रपटातीस शाहच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती.


चमत्कार (1992)


नसीरुद्दीनने आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करणारा दुसरा चित्रपट म्हणजे चमत्कार. हा चित्रपट एक हाॅरर काॅमेडी होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्याही भूमिका होत्या. 


जाने तू या जाने ना (2008)


2008 मध्ये आलेला जाने तू या जाने ना या चित्रपटात इम्रान खान आणि जेनेलिया देशमुख होते. यात शाह यांनी इम्रानच्या मृत वडिलांची भूमिका साकारली होती जो फोटो फ्रेमद्वारे आपल्या पत्नीशी संवाद साधत असे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.


इश्किया (2010)


इश्कियामध्ये नसीरुद्दीन शाह, विद्या बालन आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी प्रकारात मोडतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला देढ इश्किया नावाचा सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 


वेलकम बॅक (2015)


नसीरुद्दीन शाहने दुबईतील एका डॉनची भूमिका केली होती. अभिनेत्याचा 'मजाक था भाई मजाक' हा डायलॉग सर्वांच्या पसंतीस उतरला होता.


नसीरुद्दीन यांना अभिनय क्षेत्रात करियर करायचे होते. पण नसीरुद्दीन यांच्या वडिलांचा यास विरोध होता. पण वडिलांचा विरोध पत्करुन नसीरुद्दीन यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने त्यांनी अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयाची दखल घेत बॉलीवूडमधून त्यांना ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर नसीरुद्दीन कधीही मागे बघितले नाही. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी बॉलीवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली.अनेक ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले. किरदार, आक्रोश,चक्र, सरफरोश,इश्किया. द डर्टी पिक्चर, वेनसडे असे एकशे एक सिनेमे नसीरुद्दीन यांनी केले असून त्यांचा बॉलीवूड प्रवास अजूनही सुरु आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Manipur Violence: 'मी पूर्ण व्हिडीओ बघू शकले नाही, मला खूप वाईट वाटले'; मणिपूरमधील घटनेवर जया बच्चन यांची प्रतिक्रिया