Manipur Violence:  मणिपूरमधील (Manipur)  घटनेचा संपूर्ण देशातील लोक तीव्र शब्दात निषेध करत आहेत. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral)  झाला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन  (Jaya Bachchan) यांनी आता या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन  म्हणाल्या की, या घटनेचा  पूर्ण व्हिडीओ त्या पाहू शकल्या नाहीत, त्यांना खूप वाईट वाटलं.


काय म्हणाल्या जया बच्चन?


जया बच्चन यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मी पूर्ण व्हिडीओ बघू शकले नाही. मला खूप वाईट वाटले,  खूप लाजही वाटली. ही घटना मे महिन्यामध्ये घडली आणि आता व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण याबद्दल कुणीही एक शब्दाची सहानुभूती दाखवली नाही. हे खूप निराशाजनक आहे. रोज काही ना काही घडतं आहे. उत्तर प्रदेशबद्दल तर बोलायलाच नको. संपूर्ण देशात हे काय चालले आहे? महिलांचा एवढा अपमान... हे अत्यंत वाईट आहे.'






अभिनेते अनुपम खेर यांनी देखील मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'मणिपूरमधील दोन महिलांसोबत झालेली राक्षसी वृत्तीची  घटना लाजिरवाणी आहे. माझ्या मनात प्रचंड राग निर्माण झाला आहे. मी राज्य सरकार/केंद्र सरकारला विनंती करतो की या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. अशी शिक्षा द्या की,  भविष्यात असं करणाऱ्याचा विचार येत असताच लोक थरथर कापतील.'






 अक्षय कुमार, रेणूका शहाणे, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा या कलाकारांनी देखील ट्वीट शेअर करुन मणिपूरमधील  या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Manipur Violence: 'भयानक कृत्य...'; मणिपूरमधील घटनेवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया