Mukesh Bhatt Birthday : बॉलिवूड विश्वात थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) आज (5 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड देत या टप्प्यावर पोहोचलेल्या मुकेश भट्ट यांना त्यांचे वडील नानाभाई भट्ट यांच्याकडून चित्रपट बनवण्याची आवड निर्माण झाली. नानाभाई भट्ट स्वत: दिग्दर्शक आणि निर्माते होते. मुकेश भट्ट यांनी 1990 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 'जुर्म' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
भाऊ महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून त्यांना पहिल्या यशाची चव चाखायला मिळाली. मुकेश भट्ट बहुतेक यशस्वी चित्रपट हे थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री आहेत. त्यांच्या अशाच काही हिट थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...
राज
‘राज’ हा 2002 चा विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपता ही जोडी त्यांचे अयशस्वी लग्न वाचवण्यासाठी उटीला जाते. तिथे त्यांना एका अनैसर्गिक शक्तीचा सामना करावा लागतो. मग, पत्नी संजना आपल्या पतीला भुताटकीच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी लढते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.
गँगस्टर
‘गँगस्टर’ हा 2006 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. यात इमरान हाश्मी, कंगना रनौत आणि शायनी आहुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे संगीत प्रीतमने दिले होते. हा चित्रपट गँगस्टर अबू सालेम आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात होते. परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी या बाब नाकारली. कंगनाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि हा चित्रपट हिट ठरला.
सडक
‘सडक’ हा 1991चा महेश भट्ट दिग्दर्शित रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. संजय दत्त आणि पूजा भट्ट स्टारर 'सडक' हा 1991 सालातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्या पुरस्कार विजेत्या अभिनयासाठीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहे.
मर्डर
‘मर्डर’ हा मुकेश भट्ट निर्मित आणि अनुराग बसू दिग्दर्शित 2004मध्ये प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट होता. बँकॉक, थायलंड येथे चित्रित झालेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी, अश्मित पटेल आणि मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होते. मर्डर फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट 2002च्या अमेरिकन चित्रपट ‘अनफेथफुल’वर आधारित होता. ‘मर्डर’ चित्रपट खूप यशस्वी झाला आणि त्याला भारतीय बॉक्स ऑफिस सुपरहिट चित्रपट म्हटले गेले.
जन्नत
‘जन्नत’ हा 2008मधील कुणाल देशमुख दिग्दर्शित रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट होता. यात इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...
- Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन