एक्स्प्लोर
माझ्या आयुष्यात तू सूर्यकिरणांसारखा, बर्थ डेनिमित्त हृतिकला सुझानच्या शुभेच्छा!
हृतिकला बर्थ डे निमित्त त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने यंदाही शुभेच्छा दिल्या आहेत.
![माझ्या आयुष्यात तू सूर्यकिरणांसारखा, बर्थ डेनिमित्त हृतिकला सुझानच्या शुभेच्छा! Happy Birthday Hrithik Roshan माझ्या आयुष्यात तू सूर्यकिरणांसारखा, बर्थ डेनिमित्त हृतिकला सुझानच्या शुभेच्छा!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/10111532/Hrithik-Roshan-Sussain-Khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकला बर्थ डे निमित्त त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने यंदाही शुभेच्छा दिल्या आहेत.
सुझानने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करुन, बर्थ डे विश केलं आहे. “माझ्या आयुष्यात तू नेहमीच सूर्यकिरणांसारखा राहशील. नेहमी आनंदी राहा आणि तुझं तेज पसरत राहो” असं सुझानने म्हटलं आहे.
सुझानने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक केलं आहे.
हृतिक आणि सुझान यांनी 2014 मध्ये आपल्या 14 वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेतला होता. हृतिकने त्याचा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’च्या यशानंतर वर्ष 2000 मध्ये सुझानसोबत लगीनगाठ बांधली होती. मात्र नंतर परस्परातील मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला.
या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा रेहान 11 वर्षांचा तर लहान मुलगा रिदान 9 वर्षांचा आहे. हृतिक आणि सुझान यांनी मुलांसाठी अनेकवेळा घटस्फोटानंतरही एकत्र वेळ घालवला आहे.
मुलांसोबत दोघेही अनेकवेळा सुट्टीनिमित्त देशाबाहेर फिरायला गेल्याचं दिसले होते.
संबंधित बातम्या
घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याला हृतिक-सुझानचं उदाहरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)