Shah Rukh Khan Birthday : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहतावर्ग आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या शाहरुख खानने त्याच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. जाणून घ्या त्याच्या शिक्षणाबद्दल... 


शाहरुख खानचे शालेय शिक्षण कुठे झाले?


शाहरुख खानने 1989 साली 'फौजी' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'रोमान्स किंग', 'बादशाह' आणि 'किंग खान' म्हणून शाहरुखला जगभरात ओळखले जाते. पण शाहरुखचे शालेय शिक्षण दिल्लीतील 'सेंट कोलंबा' या शाळेत झाले आहे. 


दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून केलं ग्रॅज्युएशन 


शाहरुखने 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 'अर्थशास्त्र' या विषयात त्याने पदवी मिळवली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्याने 'मास कम्युनिकेशन' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु काही वैयक्तिक कारणाने तो पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकला नाही. 




शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद खान हे व्यापारी होते. त्याच्या आईचे नाव लतीफ फातिमा खान आणि बहिणीचे नाव शहनाज लाला रुख. शाहरुख खान आज खूप यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता आहे. किंग खान सध्या पत्नी गौरी आणि सुहाना, आर्यन आणि अब्राहम या तीन मुलांसह मुंबईतील 'मन्नत' या आलिशान बंगल्यात राहतो.


शाहरुख खानचे ब्लॉक बस्टर सिनेमे!


शाहरुख खानने अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांत काम केलं आहे. 'डर' (Dar) या सिनेमातील शाहरुखची नकारात्मक भूमिका आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ), 'दिल तो पागल है' (Dil to Pagal hai), 'स्वदेश' (Swades), वीर जारा (Veer Zara), 'जब तक है जान' (Jab Tak Hai Jaan), माइ नेम इज खान (My Name is Khan) अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Net Worth : सलमान, आमीरपेक्षाही संपत्तीच्या बाबतीत शाहरुख ठरतो सरस; बंगला, महागड्या गाड्या अन् बरंच काही