American Rapper Takeoff Shot Dead : अमेरिकन रॅपर टेकऑफची (Takeoff) हॉस्टनमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी हॉस्टनमध्ये झालेल्या गोळीबारात टेकऑफचा मृत्यू झाला. टेकऑफ हा 28 वर्षांचा होता. लोकप्रिय रॅपर्सच्या यादीत टेकऑफची गणना होते. टेकऑफच्या हत्येने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


डाइस खेळताना झाला वाद


मीडिया रिपोर्टनुसार, 'डाइस' हा खेळ खेळताना वाद झाले आणि त्यादरम्यान टेकऑफला गोळी लागली. या घटनेत आणखी दोन लोकदेखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. अद्याप पोलिसांनी आरोपींबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.








रॅपरने हत्येपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले फोटो


हत्येपूर्वी टेकऑफने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. नुकताच त्याचा 'मेसी' हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सोशल मीडियावर टेकऑफचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 80 लाख फॉलोअर्स आहेत. तसेच टेकऑफ 'मिगोस' ग्रुपचा सदस्यदेखील आहे. या 'मिगोस' ग्रुपच्या  युट्यूब चॅनलचे 12 लाखांहून अधिक सब्स्क्राईबर्स आहेत.


टेकऑफ कोण आहे?


टेकऑफचा जन्म 1994 साली लॉरेन्सविले, जॉर्जिया येथे झाला. 2008 साली त्याने पोलो क्लब या सामूहिक नावाने क्वावो आणि ऑफसेट यांच्या सहकार्याने आपल्या रॅपिंग करिअरची सुरुवात केली. मिक्सटेप जुग हा पहिला सीझन त्यांनी रिलीज केला. या ग्रुपचे अधिकृत नाव 'मिगोस' असं आहे. मिगोसचा तिसरा सदस्य रॅपर टेकऑफच्या मृत्यूनंतर, त्याचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियावर शोक करत आहेत. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना डबल सरप्राईज; DDLJ चं स्क्रिनिंग आणि पठाणचा टीझर