Guneet Monga : ऑस्कर-2023 (Oscar 2023) भारतात सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीतील पुरस्कार जिंकले. 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे केअर टेकर्स यांची गोष्ट मांडण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगानं (Guneet Monga) केली असून दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विसने केलं आहे. कार्तिकी आणि गुनीत यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर जाऊन ऑस्करची ट्रॉफी स्विकारली. आता गुनीत ही ऑस्करची ट्रॉफी घेऊन भारतात परतली आहे. गुनीत मोंगा ही शुक्रवारी (17 शुक्रवार) पहाटे लॉस एंजेलिसहून मुंबईला आली. यावेळी गुनीतचं विमानतळावर अनेकांनी स्वागत केलं.
गुनीतचं अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. गुनीतचा पती सनी कपूर हा देखील गुनीतच्या स्वागतासाठी विमानतळावर आला होता. यावेळी गुनीतच्या हातात ऑस्करची ट्रॉफी दिसली. गुनीतचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनेकांनी गुनीतच्या गाळ्यात फुलांची माळ घातली. तसेच काही लोकांनी गुनीतचं औक्षण देखील केलं.
कुठे पाहू शकता 'द एलिफंट विस्परर्स'?
'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकता. या डॉक्युमेंट्रीमध्ये तामिळनाडूतील एक कुटुंबाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हे कुटुंब हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं.
'या' माहितीपटांना मिळालं होतं नामांकन
'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीसह 'हॉलआऊट', 'हाऊ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: