Mukesh Khanna : सांस्कृतिक वासरा लाभलेल्या ठाणे (Thane) शहराला अनेक वर्षांचा पुरातन काळाचा इतिहास लाभला आहे. याच ठाणे शहरात इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या तसेच पोर्तुगीजांच्या अनेक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. तर काहींचे अवशेष आजही पाहायला मिळत आहेत. अशातच वीर चिमाजी अप्पा (Veer Chimaji Appa) यांनी देखील सतराशेच्या काळात अनेक लढाया जिंकून ठाण्यातील (Thane News) अनेक गड किल्ले पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडून घेतले आहेत. त्यांचाच पराक्रम सर्वांनाच अविरत राहावा या उद्देशाने ठाण्यातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) हे नाव बदलून वीर चिमाजी अप्पा मार्ग असे करण्यात यावे अशी मागणी शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी संग्राम फाऊंडेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) आयुक्त अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांना निवेदन देत केली आहे.


ठाणे (Thane) महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देतेना मुकेश खन्ना यांनी संग्राम फाऊंडेशनच्या वतीने फाऊंटन येथे वीर चिमाजी. चौक उभारावा अशी मागणी केली. 


मुकेश खन्ना यांचे चित्रपट आणि मालिका


मुकेश खन्ना हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतात. मुकेश खन्ना यांनी हेरा फेरी, रुही, वक्त के शहजादे, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मुकेश खन्ना यांनी भीष्म इंटरनॅशनल नावाचे युट्यूब चॅनल देखील सुरु केले आहे. या युट्यूब चॅनलवर अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखतींचे व्हिडीओ आहेत. तसेच अनेक नेटकरी त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 133K एवढे नेटकरी फॉलो करतात. 






शक्तिमान मालिकेमुळे मुकेश खन्ना यांना मिळाली लोकप्रियता


मुकेश खन्ना यांची  शक्तिमान ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली होती. 2005 पर्यंत शक्तिमान ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकरल्या. या मालिकेमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. लवकरच शक्तिमान नावाचा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात शक्तिमान ही भूमिका कोण साकारेल? याबद्दल अजून माहिती देण्यात आलेली नाही.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Shaktimaan Movie : 'शक्तिमान' चे 300 कोटींचे बजेट; मुकेश खन्ना म्हणाले, 'माझ्याशिवाय हा चित्रपट होऊच शकत नाही'