Pathaan Release To 22 March On OTT Platform: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक प्रेक्षक 'पठाण' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता या प्रेक्षकांची प्रतीक्षा 22 मार्च रोजी संपणार आहे कारण 22 मार्चला हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे.
पठाण 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
एका संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, पठाण हा चित्रपट 22 मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस झाले आहेत. आता 56 दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, पठाणचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, पठाणमधील काही डिलीटेड सीन्स देखील ओटीटीवर प्रेक्षकांना बघायला मिळतील.
पठाणची कमाई
पठाण या चित्रपटाने भारतामध्ये 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट अमेरिका, कॅनडा, यूएई, इजिप्त, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये देखील रिलीज करण्यात आला होता.
पठाणची तगडी स्टार कास्ट
पठाण या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता सलमान खानने या चित्रपटात कॅमिओ केला आहे.
पठाण चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' या दोन गाण्यांवरील रील्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तर 'झुमे जो पठाण' या गाण्यामधील शाहरुखच्या स्टेपने देखील अनेकांचे लक्ष वेधले.
शाहरुखचे आगामी चित्रपट
पठाण नंतर आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: