Govinda Marriage :  गोविंदा (Govinda) हा बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. गोविंदाच्या गाण्यांवर आजही अनेकजण बिंधास्त थिरकताना पाहायला मिळतता. त्यातच गोविंदा हा त्याच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो. गोविंदाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात. पण याच गोविंदाने 60 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) हिने गोविंदाच्या लग्नाचा घाट घातला. 


नुकतच गोविंदाने त्याच्या बायकोसोबत डान्स दिवाने 4 मध्ये हजेरी लावली. पण या कार्यक्रमादरम्यान या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याच शोमध्ये गोविंदाने पुन्हा लग्न केलंय. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या समोर आलाय. यामध्ये माधुरीने नाराजी व्यक्त करत गोविंदाला म्हटलं की, गोविंदाजी तुमचं लग्न कधी काही कळालचं नाही. त्यावेळी सुनीता यांनी देखील म्हटलं की, आमच्या लग्नाचा कोणताच फोटो नाही. यावर माधुरीने या दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. 


माधुरीने घातला लग्नाचा घाट


दरम्यान जेव्हा सुनीता यांनी सांगितलं की आमच्या लग्नाचा फोटो नाहीये, तेव्हा माधुरीने या दोघांच्या लग्नाचा पुन्हा एकदा घाट घातला. माधुरीने म्हटलं की, तुमच्या लग्नाचा फोटो नाही म्हणून काय झालं आम्ही तुमचं पुन्हा एकदा लग्न लावून देऊ. यानंतर मंचावर डान्स दिवानेची संपूर्ण टीम गोळा झाली आणि या टीमने गोविंदा आणि सुनीताच लग्नसोहळा केला. 






गोविंदा आणि सुनीताच्या चेहऱ्यावरील आनंद


यानंतर डान्स दिवानेच्या सेटवर पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनीताचं लग्न लावून देण्यात आलं. यावेळी हे जोडपं देखील खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळालं. या जोडप्याने ट्विनिंग करत गुलाबी रंगाचं आऊटफिट घातलं होतं. तसेच या दोघांना सोशल मीडियावरही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 






ही बातमी वाचा : 


Uorfi Javed with Sharukh Khan : उर्फी आणि किंग खानची भेट? शाहरुखसोबतचा सेल्फी केला शेअर पण...