Uorfi Javed with Sharukh Khan :  सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या पब्लिसिटी स्टंट्समुळे कायमच चर्चेत असते. तिचे कपडे, तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट यांमुळे देखील अनेकदा उर्फी चर्चेचा विषय असते. आता पुन्हा एकदा उर्फी तिच्या एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आलीये. यावेळी उर्फीने थेट बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबत (Shah Rukh Khan) तिचा एक सेल्फी फोटो शेअर केलाय. पण तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स तर केल्याच पण तिच्या या फोटोमध्ये काहीतरी गडबड असल्याचंही अनेकांनी म्हटलं. 


उर्फीने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा रंगलीये. पण तिच्या या फोटोमध्ये काहीतरी गडबड असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. यावर नेटकऱ्यांनीच उत्तर देखील शोधलंय. Uorfi ने इंस्टाग्रामवरुन एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे.उर्फी अगदी कॅज्युअल लूकमध्ये आहे, जणू ती तिच्या घरी आहे. केस विखुरलेले आहेत. दरम्यान हा फोटो शेअर करताना उर्फीने त्याला 'Met my favourite' असं कॅप्शन दिलंय. 


उर्फीचा खोटा फोटो


पण उर्फीने शाहरुखसोबत शेअर केलेला हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे. खरंतर ही स्नॅपचॅटची कमाल आहे. यामध्ये शाहरुख खानचा एक फिल्टर आहे. ज्याच्यासोबत तुम्ही सेल्फी घेऊ शकता. या फिल्टरचा वापर करुन उर्फीने फोटो काढला आहे. त्यामुळे उर्फीचा शाहरुखसोबतचा हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे. 


उर्फी जावेद रुपेरी पडद्यावर झळकणार


उर्फी जावेद सातत्याने आपल्या ड्रेसिंग आणि लूकने चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येते. त्याशिवाय, आपल्या सडेतोड वक्तव्यानेही उर्फी चर्चेत आली होती. आता ती बॉलिवूड चित्रपटात झळकणर आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी 'एलएसडी 2' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.






ही बातमी वाचा : 


Manoj Bajpayee : अंधेरी ते न्यूयॉर्कपर्यंत पिच्छा केला; मनोज वाजपेयीला करायचंय 'या' मराठी दिग्दर्शकासोबत काम!