Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'(Koffee with Karan) या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. आता हा कार्यक्रम प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात.
करण जोहरने आधी ट्वीट करत लिहिले होते,'हॅलो, कॉफी विथ करण हा शो मझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता.मला वाटतं की आम्ही पॉप संस्कृतीमध्ये प्रभाव पाडला. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की कॉफी विथ करण हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षरकांच्या भेटीस येणार नाही.'त्यानंतर पुन्हा आता करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे,"कॉफी विथ करण हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे".
डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित
'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन ओटीटीवर येणार असल्याचे करण जोहरने ट्वीट करत चाहत्यांना सांगितले आहे. हा कार्यक्रम डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान (Aamir Khan) , शाहरूख खान (Shah Rukh Khan) , अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सलमान खान (Salman Khan) यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या