Ghoda Movie Poster Out : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे, जगासमोरच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर हात घालणारे वास्तववादी सिनेमे गेले काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला 'घोडा' (Ghoda) हा मराठी सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'घोडा' हा सिनेमा येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने सिनेप्रेमींना आता या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमातील मुख्य नायक कैलास वाघमारेने (Kailash Waghmare) या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे, "एक घोडदौड... जगण्याची... संघर्षाची... स्वप्नांची...! 17 फेब्रुवारी 2023 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात". या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आगामी सिनेमासाठी कैलासला शुभेच्छा देत आहेत.
'घोडा' सिनेमात काय पाहायला मिळणार?
स्वप्न पाहणं आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणं. तसेच माणसाच्या वेगवेगळ्या वृत्तींचा प्रवास 'घोडा' या सिनेमात दाखवण्यात आला आहे. एका बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून अगदी तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते कशी धडपड करतात याची गोष्ट 'घोडा' या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
'घोडा' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...
'घोडा' या बहुचर्चित सिनेमात कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टी. महेश यांनी सांभाळली आहे. तर जमीर अत्तारने या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर निलेश महिगावकर यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. विविध महोत्सांत गौरवलेल्या या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.
आगामी मराठी सिनेमे
'जग्गू आणि जुलिएट' हा मराठी सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच नागराज मंजुळेचा 'घर बंदूक बिर्याणी' हा मराठी सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :