Entertainment News Live Updates 4 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Feb 2023 05:43 PM
Vanita Kharat: वनिता खरातनं लग्नात घेतला खास उखाणा; म्हणाली, '...तूच माझा माहाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा'

Vanita Kharat: अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधली आहे. वनिताच्या लग्नसोहळ्याचे तसेच हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील वनिता आणि सुमितच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. नुकताच वनिताच्या विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता उखाणा घेताना दिसत आहे.  



Daar Ughad Baye : 'दार उघड बये' मालिकेचा रंगणार विवाह विशेष भाग

Daar Ughad Baye Marathi Serial Special Episode : 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेचा विवाह विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.





Ghoda : एक घोडदौड... जगण्याची... संघर्षाची... स्वप्नांची...! कैलास वाघमारेच्या 'घोडा'चं पोस्टर आऊट

Ghoda Movie Poster Out : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे, जगासमोरच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर हात घालणारे वास्तववादी सिनेमे गेले काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला 'घोडा' (Ghoda) हा मराठी सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 





'पठाण नाही तर नेटफ्लिक्सवरचा अॅन अॅक्शन हिरो पाहा' नेटकऱ्याचं ट्वीट; आयुष्मान म्हणाली, 'थँक्यू पण हे...'

Action Hero: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये या नेटकऱ्यानं अभिनेता आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) अॅन अॅक्शन हिरो (Action Hero) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता या नेटकऱ्याच्या ट्वीटला आयुष्माननं रिप्लाय दिला आहे. 



Shah Rukh Khan : शाहरुखकडे चाहत्यानं मागितला 'पठाण'च्या कमाईतला हिस्सा

'आस्क एसआरके'मध्ये एका नेटकऱ्याच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे,"पठाण' सिनेमा पाहायला पाच वेळा गेलो. 700 कोटींमधले एक कोटी मला देऊन टाका सर". यावर शाहरुखने कमेंट केली आहे,"भावा ऐवढा रेट ऑफ रिटर्न शेअर मार्केटमध्येही मिळत नाही. आणखी काही दिवस थांब... मग बघू... हा..हा". 





#Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान स्पष्टच म्हणाला...

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. 



Sapna Choudhary: सपना चौधरीवर गुन्हा दाखल; हुंड्यात क्रेटा गाडी मागितल्याचा आरोप

Sapna Choudhary : ठुमका क्विन सपना चौधरी   (Sapna Choudhary) ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते. अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे. सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पलवल (Palwal) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Fursat : विशाल भारद्वाजचा 'फुरसत' प्रेक्षकांच्या भेटीला; Iphone 14 Pro मध्ये झालंय सिनेमाचं शूटिंग

Vishal Bhardwaj Fursat Trailer : लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) 'फुरसत' (Fursat) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचं शूटिंग हे मोठ-मोठ्या कॅमेराने न करता आयफोन 14 प्रोमध्ये (Iphone 14 Pro) करण्यात आलं आहे. 





Rakhi Sawant - Adil Khan : "आदिल मला जोकर म्हणतो"; राखी सावंतचा पतीवर गंभीर आरोप

Rakhi Sawant Adil Khan Wedding : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे आणि आदिल खानमुळे (Adil Khan) चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिलवर फसपवणूक केल्याचे आरोप जाहीरपणे केले आहेत. 

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'पठाण'चा बोलबाला

Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने आता सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत. किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत. 





Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज?

Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. सोनाली कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. दरम्यान सोनालीने 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 





Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : कियारा आडवाणी मिसेस मल्होत्रा होण्यास सज्ज!

Kiara Advani - Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आयुष्यभरासाठी सिद्धार्थची जोडीदार होण्यास कियारा सज्ज आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. लग्न सोहळ्याच्या ठिकाणापासून ते लग्नात कोण कोण पाहुणे असतील अशा सर्वच गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bholaa: 'ये है भोला के शैतान...'  अजय देवगनच्या 'भोला'च्या व्हिलनचे खतरनाक लूक जारी


Ajay Devgn Bholaa New Posters: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या नवीन चित्रपट 'भोला'मध्ये व्यस्त आहे. त्याने या सिनेमातील त्याचा आणि तब्बूचा लूक या आधीच शेअर केला आहे. आता अजयने इतर स्टारकास्टच्या लूकची झलक दाखवली आहे, ते पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. भोला चित्रपटात गजराज राव, दीपक डोबरियाल आणि विनीत कुमार सारखे स्टार्सही दिसणार आहेत.


'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत


King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचे पोस्टर जारी केले आहे. याशिवाय सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार आहे याची तारीख देखील जाहीर केली आहे. या सिनेमातील सलमानचा लुक जबरदस्त असणार आहे. चाहत्यांना हा लुक खूपच आवडला आहे. निर्मात्यांनी लुकचे पोस्टर जारी केल्यानंतर चाहत्यांनी तो सोशल मीडियावर शेअर करत सलमानच्या लुकवर कौतुकाचा वर्षाव केलाय.


Gurmeet Debina Daughter : गुरमीत-देबिनाने शेअर केला मुलीचा पहिला फोटो


Debina Gurmeet Doughter Divisha Photo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) नेहमीच त्यांची पर्सनल लाईप सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. देबिनाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या दुसऱ्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर चाहत्यांना मुलीचा चेहरा पाहण्याची भयंकर उत्सुकता होती. नुकताच या कपलने आपल्या दुसऱ्या मुलीचाही चेहरा रिव्हील केला आहे. हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. 


Piff Pune : पुण्यात जॉनी लिव्हर अन् विद्या बालनच्या उपस्थितीत रंगणार यंदाचा 'पिफ'


21 व्या 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'ला  (Pune international film festival)  धुमधडाक्यात सुरुवात झाली. या महोत्सवात फक्त चित्रपट प्रेमींना फक्त चित्रपटच तर दाखवली जाणार नसून त्यांच्यासाठी खास व्याख्यानं आणि काही कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात ए श्रीकर प्रसाद, चैतन्य ताम्हाणे, शाजी करून, राहुल रवैल, जॉनी लिव्हर  आणि महत्वाचं म्हणजे अभिनेत्री विद्या बालनदेखील ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर तिचं मत मांडणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉनमध्ये हे चर्चासत्र होणार आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीत यंदा  पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दिमाखात पार पडणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.