Vishal Bhardwaj Fursat Trailer : लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) 'फुरसत' (Fursat) या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. या शॉर्ट फिल्मची खासियत म्हणजे, सिनेमाचं शूटिंग हे मोठ-मोठ्या कॅमेराने न करता आयफोन 14 प्रोमध्ये (Iphone 14 Pro) करण्यात आलं आहे.
एखाद्या सिनेमाचं शूटिंग स्मार्टफोनमध्ये झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मोठमोठ्या कॅमेऱ्यांचा वापर करत शूटिंग करण्यात येत असतं. पण आता विशाल भारद्वाजच्या आगामी शॉर्ट फिल्मची शूटींग स्मार्टफोनच्या मदतीने करण्यात आली आहे. ही शॉर्ट फिल्म, 30 मिनिटांची आहे. ही शॉर्ट फिल्म प्रेक्षक यूट्यूबवर पाहू शकतात.
'फुरसत' कुठे पाहू शकता? (Where can you watch Fursat)
आयफोन 14 प्रोच्या मदतीने शूट करण्यात आलेली 'फुरसत' ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना यूट्यूबवर पाहता येईल. तसेच अॅपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरदेखील प्रेक्षकांना ही शॉर्ट फिल्म पाहता येईल. अॅपलने विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'फुरसत' ही शॉर्ट फिल्म 3 फेब्रुवारी 2023 रोजी यूट्यूबवर (Youtube) प्रदर्शित केली आहे.
'फुरसत' सिनेमाचं कथानक काय आहे? (Story Of Fursat)
'फुरसत' या सिनेमाचं कथानक निशांत नावाच्या एका मुलाच्या आयुष्यावर भाष्य करणारं आहे. निशांतला 'दूरदर्शक' (Doordarshak) नावाचा एक प्राचीन अवशेष सापडतो. त्यानंतर निशांत त्या अवशेषाच्या मागे-मागे फिरतो. अवशेषामुळे तो त्याच्या आयुष्यातील प्रेमदेखील गमावतो.
Iphone 14 Pro ची वैशिष्ट्ये काय आहेत?
'फुरसत' या सिनेमाचं शूटिंग 'Iphone 14 Pro'मध्ये करण्यात आलं आहे. अॅपलने हा फोन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये सेकंड-जेन सेन्सर-शिफ्ट ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 48-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सरदेखील आहे.
'फुरसत'आधी वामिकाने विशाल भारद्वाजसोबत 'मॉर्डन लव्ह : मुंबई' या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तसेच ती विशालच्या 'खुफिया' या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर ईशान खट्टरचा 'पिप्पा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :