Singham Again Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये रिलिज झालेल्या सिंघम अगेन आणि भुलभूलैय्या 3 या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी ४३ कोटींचा गल्ला करत या सिनेमानं बॉक्सऑफिसवर डरकाळी फोडली. आता आठवडाभरानंतर या सिनेमानं किती कोटींचा गल्ला केलाय? पाहूया...
अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची प्रमुख स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाची जवळपास महिनाभरापासून चर्चा होती. दमदार स्टारकास्ट, अंगावर शहारे आणणारे स्टंट आणि त्यासोबतच कॉमेडी... हे जणू समीकरण झालं आहे. असाच मनोरंजनाच्या सर्व घटकांनी परिपूर्ण असलेला 'सिंघम अगेन' पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचले आहेत.
आठवड्याच्या शेवटी केला एवढा गल्ला
सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीचा सिंघम अगेन या चित्रपटानं प्रदर्शनानंतच्या पहिल्या शुक्रवारी साधारण ७.५० कोटींचा गल्ला केला. पहिल्या दिवशी 43.5 कोटींचा बिझनेस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी, रपिपारी 35.75 कोटी असा गल्ला करत करत या सिनेमानं आतापर्यंत 180 कोटींचा गल्ला केला आहे. चौथ्या दिवशी 18 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 14 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 10.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा गल्ला ओलांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातही थेएटर्समध्ये या चित्रपटाला स्क्रीन्स असतील यात शंका नाही.
350 कोटींच्या बजेट वसूली तरी होणार का?
'सिंघम अगेन'ची कमाई विकडेजमध्ये सातत्यानं घटत असल्याचं पाहायला मिळत आहे. सातव्या दिवशी हा चित्रपट सिंगल डिजिटवर आला. चित्रपटाच्या कमाईचा आलेख पाहता आता निर्मात्यांचीही चिंता वाढली आहे. खरं तर, या चित्रपटानं रिलीजच्या सात दिवसांत 200 कोटींचा आकडाही गाठलेला नाही, अशा परिस्थितीत 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला त्याची किंमत वसूल करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.
तर, दुसरीकडे दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढेल आणि तो भरघोस कलेक्शन करेल, असा अंदाज आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर खिळल्या आहेत. आता येत्या विकेंडला तरी सिंघम अगेनचा गल्ला वाढणार का? आणि चित्रपट बक्कळ कमाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.