Genelia Deshmukh : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महाराष्ट्राचे ते लाडके दादा-वहिनी आहेत. साऊथ, हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतही त्यांचा दबदबा आहे. सोशल मीडियावर दोघेही सक्रीय आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच ते एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आता जिनिलिया देशमुखचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया देशमुख आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. जिनिलिया देशमुखला एक मराठमोळा पदार्थ आवडतो. जिनिलिया देशमुखचा आवडता मराठमोळा पदार्थ ऐकूण महाराष्ट्रातील (Maharashtra) तिच्या चाहत्यांना वेड लागलं आहे. 


विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची सून, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी तसेच दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशी जिनिलिया देशमुखची ओळख आहे. 'वेड' (Ved) या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. या सिनेमातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.  


मोठे सेलिब्रिटी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण अनेक कलाकारांना महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा स्ट्रीट फूड खायला आवडतं. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनादेखील भटकंती करण्याची आणि तिथले लोकल पदार्थ खायला आवडतात. तसेच दोघेही प्रचंड फुडी आहेत. 


जिनिलियाला कोणता पदार्थ आवडतो? (Genelia Deshmukh Favourite Maharashtrian Food)


काही दिवसांपूर्वी 'कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया देशमुखने आपला आवडता पदार्थ सांगितला आहे. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये असणारा जवस आणि ठेचा आवडत असल्याचं जेनिलिया म्हणाली होती. तसेच रितेश देशमुखही जिनिलियाला पाणीपुरी आवडते असं म्हणाला होता. तसेच लातूरला गेल्यावर ती ठेचा, भाकरी, पिठलं-भाकरी, शेंगदाण्याची चटणी, काळ्या मसाल्याची आमची या पदार्थांवर ताव मारते असंही रितेश म्हणाला होता. रितेश-जिनिलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 






जिनिलियाला आवडणारा ठेचा कसा बनवावा? (Thecha Recipe)


- हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्यावे.
- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, लसूण आणि शेंगदाणे घालून ते भाजून घ्यावे. 
- पॅनमधील मिश्रण थंड झाल्यानंतर ते खलबत्यात ठेचून घ्यावे. 
- तिखटपणा कमी करण्यासाठी वरुन लिंबाचा रस घालावा.


संबंधित बातम्या


Riteish Deshmukh Genelia D'souza : रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची 12 वर्षे; महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी