Riteish Deshmukh Genelia D'souza : बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुजा (Genelia Dsouza) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची 12 वर्षे खूपच कमाल होती. 


'तुझे मेरी कसम' म्हणत 'असे' झाले महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी (Riteish Deshmukh Genelia Dsouza Lovestory)


रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच कमाल आहे. 'तुझे मेरी कसम'पासून ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कमाल होता. रितेश-जिनिलियाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. पण त्यावेळी जिनिलियाने रितेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 






'तुझे मेरी कसम'नंतर त्यांचा 'मस्ती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. 10 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत त्यांचं लग्न झालं होतं. रितेश-जिनिलियाच्या मुलांची नावे रियान आणि राहिल अशी आहेत. 


रितेशसोबत रिलेशनमध्ये असताना जिनिलिया अनेकदा देशमुखांकडे गेली होती. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"रितेशच्या आईमुळे मला चांगलं मराठी येऊ लागलं आहे. लग्नाआधी मी रितेशची मैत्रीण म्हणून त्यांना भेटले आहे. सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती. मुख्यमंत्र्यांचं घर आहे, आपण कसं वागायचं, कसं बोलायचं? हे काही कळत नव्हतं. पण ते सगळे सर्वसामान्य लोकांप्रमाणे घरार वावरत होते. मी आणि रितेशची आई त्यादिवशी त्यांच्या घरातील श्वानांबरोबर खेळलो. एवढं सुंदर वातावरण त्यांच्या घरी होतं". 


रितेश-जिनिलिया एकमेकांना 'या' नावाने हाक मारतात


रितेश जिनिलियाला जीन्स या नावाने हाक मारतो. तर जिनिलिया रितेशला प्रेमाने ढोलू अशी हाक मारते. लग्नानंतर जिनिलिया मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. पण मुलं मोठी झाल्यानंतर आता तिने पुन्हा एकदा 'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. रितेश-जिनिलियाच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Riteish Deshmukh: रितेशच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाची खास पोस्ट, म्हणाली, "रितेश देशमुख कोण आहे? असं जर मला कोणी विचारलं तर मी ..."