Riteish Deshmukh Genelia Deshmukh Birthday : अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहे. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त (Genelia D'Souza) अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


रितेश देशमुखची रोमँटिक पोस्ट (Riteish Deshmukh Romantic Post For Genelia Deshmukh)


रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने लिहिलं आहे,"तू माझी जिवलग मैत्रीण आहेस, माझ्या कठीण काळात तू कायम माझ्यासोबत असतेस, मला प्रोत्साहन देत आली आहेस, तू माझी सर्वकाही आहेस... तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा...".






रितेशने पुढे लिहिलं आहे,"माझं आयुष्य सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार... माझी पत्नी, माझं वेड... खूप खूप प्रेम जिनिलिया". रितेश देशमुखने जिनिलियासोबतचा एक रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते या फोटोवर कमेंट्स करत त्यांच्या लाडक्या जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


रितेश-जिनिलियाची प्यारवाली लव्हस्टोरी... (Riteish Deshmukh Genelia Deshmukh Love Story)


रितेश आणि जिनिलिया देशमुख हे मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये रितेश-जिनिलिया लग्नबंधनात अडकले आहेत. रितेशला वेळोवेळी जिनिलियाने खूप मदत केली आहे. त्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. 


रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. आता या सिनेमाचा येत्या 20 ऑगस्टला वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे. मराठीआधी तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील सिनेमांत अभिनेत्रीने काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'ट्रायल पीरियड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संबंधित बातम्या


Ved World Television Premiere : ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही... रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चा होणार वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर