Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved World Television Premiere : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या घरबसल्या पाहता येणार आहे. 'वेड' या बहुचर्चित सिनेमाचा आता वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे. 


'वेड'चा वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर कधी होणार? (Ved World Television Premiere)


'ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही' असं म्हणत 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमागृहात या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे. येत्या 20 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता प्रेक्षक हा सिनेमा घरबसल्या पाहू शकतात. आता छोट्या पडद्यावर हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






बॉक्स ऑफिसवर 'वेड'चा धमाका!


'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Ved Box Office Collection) 2.25 कोटींची कमाई केली होती. सुरुवातीलाच दणदणीत कमाई करणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा गल्ला जमवला. 'वेड' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक होते. 'वेड' हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. 'वेड' या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलियाने मराठी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 


'वेड' या सिनेमातील गाणी, रितेश-देशमुखचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा 'वेड' ठरला होता. मराठी प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला. सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचं 'वेड' पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला रितेश-जिनिलियाचा 'वेड'


'वेड' या सिनेमात रितेश देशमुख (Riteish Deshmukh), जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh), अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) आणि शुभंकर तावडे (Shubhankar Tawade), जिया शंकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'वेड' सिनेमाचं दिग्दर्शन रितेशनं केलं असून निर्मिती जिनिलियानं केली आहे. 


संबंधित बातम्या


Ved On OTT: रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? जाणून घ्या