Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा नेहमी चर्चेत असतो.  गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक हा अडचणींचा सामना  करत आहे. अरमानची  पत्नी आणि त्याच्या मुलांची तब्येत खराब झाली होती. आता अरमान मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यासोबत चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. अरमानची चेन चोरीला गेली आहे. 


अरमान मलिकसोबत चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. अरमान मलिकने त्याच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. अरमान मलिकने सांगितले की, 'पत्ता विचारण्याच्या बहाण्याने काही मुलांनी मला कारची काच उघडायला सांगितली. त्या मुलांनी विचारले,  इथे मॉल वगैरे आहे का? मी त्यांना सांगितले की, हो इथे जवळच मॉल आहे, त्या मुलांमधील एका मुलानं मला संभाषणात गुंतवले आणि एकाने माझी चेन हिसकावली त्यानंतर ती मुलं फरार झाली.'


अरमानने सांगितले की, ती मुलं ऑफिसला जाणारी मुलं वाटत होती आणि दोघांनी चष्मा घातलेला होता. मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले अरमाननं व्लॉगमध्ये सांगितलं.  


अरमानने सांगितले की, ' त्या मुलांच्या कारवर नंबर प्लेट नव्हती.'  अरमानच्या स्टाफ मेबरनं सांगितले की, 'ती मुले गाडीजवळ बराच वेळ फिरत होती, तेव्हापासून त्यांना संशय येऊ लागला. पण नंतर असे वाटले की कोणीतरी चाहता सेल्फी काढायला आला असावा.'


कोण आहे अरमान? 


अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करतो. अरमाननं पायलसोबत 2011 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये कृतिकासोबत लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. 






अरमान मलिकला अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोल केले जाते. एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


 Armaan Malik Gym Fees:युट्यूबर अरमान मलिकची नवी जिम; एका महिन्याची फी ऐकून व्हाल थक्क!