Gaurav More On Salman Society Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे (Gaurav More) आता 'सलमान सोसायटी' (Salman Society) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'सलमान सोसायटी' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील एक सॉन्ग लॉन्च करण्यात आले असून 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.


शिक्षणावर भाष्य करणारा 'सलमान सोसायटी'
 
'सलमान सोसायटी' सिनेमाचं दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलं आहे. 'सलमान सोसायटी' हा सिनेमा शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. 'पार्टी दणाणली' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे.


'सलमान सोसायटी' या सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे (Gaurav More) एका वेगळ्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. 


बाल कलाकार पुष्करने या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी' आणि 'टी. टी. एम. एम' झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट 'रईस'मध्ये बालपणीच्या शाहरुख खानची भूमिका बजावली. तसेच 'हाफ टिकिट', 'फास्टर फेणे' जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पावसा, माउली'मध्ये भूमिका केल्या आहेत. 


'सलमान सोसायटी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


सिनेमात उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच सिनेमामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.'पार्टी दणाणली' हे गाणे रसिकांना भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलर ची जो लवकरच प्रदर्शित होईल . 17 नोव्हेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Gaurav More: "बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना..."; गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ