Priya Bapat On Kalavantancha Ganesh : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकामुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीने गणेशोत्सवादरम्यान भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तिने गणेशोत्सवादरम्यानचा (Ganeshotsav 2023) तिचा फिटनेस फंडा शेअर केला आहे. 


बाप्पाच्या मूर्तीला मानत नाही. तर त्याच्या एनर्जीला, सकारात्मकतेला मानते : प्रिया बापट


एबीपी माझाशी बोलताना प्रिया बापट म्हणाली, "गणेशोत्सवातलं वातावरण मला खूप आवडतं. आनंदाने, मनापासून आणि प्रेमाने हा उत्सव लोकांसोबत साजरा करायला मला आवडतो. गणेशोत्सवातला सकारात्मक माहोल मला प्रचंड भावतो. उमेशच्या लहानपणापासून आमच्या घरी बाप्पा येत आहे. मी बाप्पाच्या मूर्तीला मानत नाही. तर त्याच्या एनर्जीला, सकारात्मकतेला मानते".


गणेशोत्साबद्दल बोलताना प्रिया बापट म्हणाली,"प्रत्येक क्षणाला निसर्ग तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. या निसर्गातल्या सकारात्मक उर्जेवर माझा विश्वास आहे. माझ्या आयुष्यातले सर्वच गणेशोत्सव हे माझ्यासाठी आठवणीतले आहेत. माझं बालपण दादरमध्ये गेलं. आमच्या सोसायटीत सार्वजनिक गणपती असायचा.आणि अनेकांच्या घरीदेखील असायचा. त्यावेळी त्यांचा गणपती हा मला माझ्या घरचा गणपती असल्यासारखाच होता". 






मिरवणुकीत नाचणारी मुलगी मी नव्हे : प्रिया बापट


प्रिया पुढे म्हणाली,"गणेशोत्सवाइतकं सुंदर वातावरण मी इतर कोणत्याही सणाला बघत नाही. मिरवणुकीत नाचणारी मुलगी मी नव्हे. मला अंत्यत शांतपणे फक्त झांझ, टाळ्या आणि वेगवेगळ्या प्रकरच्या आरत्या म्हणायचं कौतुक आहे. छान मोदक करुन, नैवेद्यचं ताट सजवून आणि घरी आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारायला मला आवडतं. 


प्रिया बापट प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गणेशोत्सवादरम्यानचा फिटनेस फंडा चाहत्यांसोबत शेअर करत ती म्हणाली,"मला जंकफूड आवडत नाही घरगुती खाणं आवडतं. बाप्पा आल्यावर मोदक खायचा आणि सकाळी उठून धावायचं. व्यायाम करायचा आणि खायचं..खाणं सोडायचं नाही. मला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायला मला आवडतो. आता बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे".


संबंधित बातम्या


Subodh Bhave : कधी काही चूक झाली तर त्याच्याकडे जातो अन्...; सुबोध भावे आणि बाप्पाचं नातं आहे खास