Jawan Google Search: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 75 कोटींचे कलेक्शन करून अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुखच्या जवान चित्रपटाची क्रेझ देशभरात बघायला मिळत आहे. आता गुगलवरही (Google) तुम्हाला जवानची क्रेझ बघायला मिळेल.
गुगलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'तयार आहे का? जवानाला शोधलं तरच तो सापडेल'
- सर्वप्रथम Google वर Jawan सर्च करावे.
- तुम्हाला स्क्रीनवर वॉकी-टॉकीचा आयकॉन दिसेल. या आयकॉनवर क्लिक करा.
- तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला शाहरुखचा आवाज ऐकू येईल.
- दुसरीकडे, तुम्ही या आयकॉनवर क्लिक कराल राहाल, तेव्हा तुम्हाला स्क्रिनवर काही बँडेज दिसतील.
शाहरुखनं गुगलचं ट्वीट रिट्वीट करुन लिहिलं, 'गुगलवर आणि थिएटरमध्येही जवानाला शोधा! हे खूप मजेशीर आहे.'
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या चित्रपटानं ओपनिंग-डेला 74.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 53 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटानं 127.50 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.
'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि दीपिका पादुकोण यांचा कॅमिओ आहे. जवान चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: