Gashmeer Mahajani:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. गश्मीर हा इन्स्टाग्रामवरील  ‘आस्क गश फॉर अ मिनिट्स’ (Ask Gash for A few minutes) या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. नुकतेच काही नेटकऱ्यांनी गश्मीर महाजनीला काही प्रश्न विचारले या प्रश्नांना गश्मीरनं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Continues below advertisement


एका नेटकऱ्यानं इन्स्टाग्रामवर गश्मीरला प्रश्न विचारला, 'वडिलांच्या निधनानंतर केस कापतात, यावर काय बोलाल? मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल. ' गश्मीरनं चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं,  'मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थाजन होते. मी टक्कल केले असते तर हातातून कामे गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?'




दुसऱ्या युझरनं ‘आस्क गश फॉर अ मिनिट्स’ या सेशनमध्ये गश्मीरचं कौतुक केलं. त्यानं लिहिलं, 'तुम्ही मराठीमधील शाहरुख खान आहात' नेटकऱ्याच्या या कमेंटला गश्मीरनं उत्तर दिलं, खूप छान कॉम्पिमेंट आहे. पण मला गश्मीरच राहूद्या. छान करमणूक करेन तुमची'




गश्मीरचे वडील अभिनेते   रवींद्र महाजनी  (Ravindra Mahajani) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रवींद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं.  अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील रवींद्र महाजनी यांनी काम केले.


सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद, कान्हा आणि  कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. आता गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


काही दिवसांपूर्वी त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं,"पुन्हा एकदा तोच प्रवास...लवकरच.." गश्मीरच्या या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गश्मीरनं त्याच्या या नव्या प्रोजेक्टच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Gashmeer Mahajani: 'जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही ते मी तुम्हाला...'; चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला गश्मीर महाजनीनं दिलं उत्तर