Salman Khan :  'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा जयघोषात काल (31 ऑगस्ट) गणेशाचं स्वागत केलं गेलं. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहिण अर्पिता खानच्या घरी देखील गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. अर्पिताच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे आर्पिताच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. नुकताच सलमान खाननं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. 


सलमाननं शेअर केला व्हिडीओ


सलमाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्पिताच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती दिसत आहे. तर सलमान सोबतच आर्पिताचा पती अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेता रितेश देशमुख हे बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. कतरीना कैफ,विक्की कौशल, रितेश देशमुख,जेनेलिया डिसूजा, सोहेल खान या सेलिब्रिटींनी आर्पितायच्या घरी बप्पाचं दर्शन घेण्यास हजेरी लावली. 


पाहा व्हिडीओ:






सलमानचे आगामी चित्रपट


लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली', 'टायगर-3' या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच सलमान बिग बॉसच्या नव्या सिझनचं सूत्रसंचालन देखील करणार आहे. सलमानहा रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी रितेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. सलमानच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


In Pics : मराठी मालिकाविश्वातील कलाकारांच्या घरी बाप्पाचं थाटामाटात आगमन