Jacqueline Fernandez : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकणात समन्स बजावला आहे. तिला 26 सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
सुकेशनं जॅकलिनला दिले महागडे गिफ्ट्स
सुकेशनं 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील गिफ्ट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.
जॅकलिनचा आगमी चित्रपट
जॅकलिनचा रामसेतू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये जॅकलिनसोबतच अभिनेत्री नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: