Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाली चित्रपट आणि छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येते. काल अनेकांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. पण सोनालीनं मात्र यंदा त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा न करण्यामागील कारण एक भावनिक पोस्ट शेअर करुन सांगितलं. 


सोनालीची पोस्ट
सोनालीनं तिच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर करुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनालीनं तिच्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सोनालीनं यंदा तिच्या घरी गणपती बप्पाचं आगमन होणार नाही, अशी माहिती दिली. सोनालीनं पोस्टमध्ये लिहिलं, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यादंच गणपती बसवत नाहीयोत. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतेंय. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पा कडेच गेलीये. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.'






सोनालीच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. सोनालीनं एक पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. आजीसोबतचे काही फोटो सोनालीनं शेअर केले.त्याला तिनं कॅप्शन दिलं, 'आजी …..तू आमच्यात असशील…. आम्ही असे पर्यंत'






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 1 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!